माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी : खोटे सोने देवून गळ्यातील सोन्याची चैन लबाडीने दोन चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आटपाडी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी, शिवाजी महादेव चव्हाण (वय 85) रा. सोनारसिद्धनगर, पुजारवाडी, आटपाडी भाजीमंडई मधुन बाजार घेऊन चालत सिद्धनाथ चित्र मंदिरकडे निघाले होते. मटण मार्केट जवळ एक अनोळखी इसमाने, फिर्यादीस तुम्ही कोठे निघाला आहे, दुसऱ्या माणसांचे सोने हरवले आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा असे म्हणालेवर फिर्यादी हे तेथेच रोड कडेला थांबले.
यावेळी दुसरा अज्ञात त्या ठिकाणी आला व माझे सोने सापडले आहे असे म्हणाला. त्यानंतर त्या दोघांनी फिर्यादीस जवळच असले बाकड्यावर बसणेस नेले व त्यातील एका अनोळखी इसमाने फिर्यादीस तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन मला द्या मी माझ्याकडे असलेले 10 तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट तुम्हाला देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यावेळी फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन त्यांनी घेवून त्यांचेकडील सोन्यासारखे दिसणारे पिवळ्या धातुचा खोटा देवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.