जामीन अर्ज फेटाळला तरी, ‘कोरटकर’ पोलिसांना शरण नाहीच ; अटकेची टांगती तलवार..!

0
98

माणदेश एक्सप्रेस न्युज / कोल्हापूर : इतिहासकार इंद्रजित सावंत (Indrjeet Sawant) यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे, अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकरने (Prashant Koratkar) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला नाही हे विशेष आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे.

 

कोरटकरला कुठल्याही क्षणी अटक?
या प्रकरणी कोल्हापूर नागपूरमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे. अशातच आता अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. मात्र अटकपूर्व जामीन फेटाळला शिवाय सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली असली तरी सुद्धा प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण आलेला नसल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here