
ऍसिडिटी, गॅस किंवा छातीत होणारी जळजळ यावर सर्वात झटपट घरगुती उपाय म्हणून अनेक घरांमध्ये ENO हा शब्द अगदी ओळखीचा आहे. “इनॉ टाकला की लगेच आराम” असं आज अनेकदा ऐकायला मिळतं. पण तुम्हाला माहिती आहे का, ENO हे प्रत्यक्षात कंपनीचं नाव आहे; तर त्यामधील पावडरचं खरं नाव काय आहे?
ENO हे Haleon कंपनीद्वारे उत्पादित केलेलं एक सामान्य अँटासिड (Antacid) आहे. पोटातील आम्लता कमी करणं, गॅस थांबवणं आणि छातीत होणारी जळजळ कमी करणं हे याचं मुख्य कार्य आहे. भारतासह जगभरात ENO हा सर्वात लोकप्रिय ओव्हर-द-काउंटर औषधांपैकी एक मानला जातो.
ENO मधील पावडरचं खरे नाव म्हणजे सोडियम बायकार्बोनेट (Sodium Bicarbonate).
याशिवाय त्यात सोडियम कार्बोनेट आणि सायट्रिक आम्ल हे घटक असतात.
सोडियम बायकार्बोनेट : ज्याला आपण साधारणतः बेकिंग सोडा म्हणूनही ओळखतो.
सायट्रिक आम्ल : जे लिंबासारखं आंबट असतं.
सोडियम कार्बोनेट : हे देखील पोटातील आम्लता कमी करण्यात मदत करतं.
जेव्हा ENO पावडर पाण्यात मिसळली जाते, तेव्हा रासायनिक प्रतिक्रिया होऊन फेस येतो. या प्रक्रियेत कार्बन डाय-ऑक्साईड वायू तयार होतो. त्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडतो, जळजळ कमी होते आणि ऍसिडिटीचा त्रास त्वरित आटोक्यात येतो.
फक्त पोटदुखी किंवा ऍसिडिटीपुरताच नाही, तर ENO चा वापर घरगुती इतर कामांसाठीही केला जातो.
दागिने स्वच्छ करणे : सोने किंवा चांदी काळी पडली असल्यास गरम पाण्यात ENO टाकून त्यात दागिने भिजवल्यास ते पुन्हा चमकू लागतात.
घरगुती उपाय : काही लोक ते भांड्यांचा मळ काढण्यासाठी किंवा छोटे साफसफाईचे प्रयोग म्हणून वापरतात.
आजही ENO हे नाव उच्चारलं की लगेच ऍसिडिटीपासून सुटका करणारी पावडर डोळ्यांसमोर येते. पण प्रत्यक्षात ती ENO पावडर नसून सोडियम बायकार्बोनेट व इतर घटकांचं मिश्रण आहे. त्यामुळे पुढच्यावेळी कोणी विचारलं की “ENO म्हणजे काय?”, तर लक्षात ठेवा – कंपनीचं नाव ENO आणि त्यातील पावडर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आधारित अँटासिड.


