
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : करगणी येथे वृद्धाच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यालाच दगडाने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
यातील फिर्यादी पंढरीनाथ उर्फ पंडा दऱ्याबा खिलारी ( वय ७५) रा. करगणी, ता. आटपाडी हे करगणी जुने एसटी स्टँड येथे बसले होते. यावेळी यातील आरोपी त्यावेळी तुकाराम यांने येऊन फिर्यादीच्या पायात मोटर सायकल घातली. त्यावेळेस फिर्यादी व आरोपी तुकाराम ही खाली पडले फिर्यादीलाही व आरोपीलाही लागले.
त्यानंतर आरोपीने आरडाओरडा करून त्यांने त्याचे मुलगे समाधान व नितीन यांना बोलावून घेऊन फिर्यादीस दगडाने डोक्यात व डावे हातावर मारहाण करून जखमी करून, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत असताना फिर्यादीचा मुलगा दत्तात्रय त्या ठिकाणी आला. त्याने भांडणे सोडवली.
फिर्यादी पंढरीनाथ उर्फ पंडा दऱ्याबा खिलारी यांच्या फिर्यादीनुसार आरोपी तुकाराम विठोबा खिलारी, समाधान तुकाराम खिलारी, नितीन तुकाराम खिलारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.