अमेरिकेत एका महिलेला तिच्या मुलीला कारमध्ये कोंडल्याप्रकरणी आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटककेली आहे. महिने तिच्या आठ वर्षांच्या मुलीला कारमध्ये कोंडून ठेवले त्यात उष्णतेमुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. ॲश्ली स्टॉलिंग्ज असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी महिला तिच्या मुलीला काही कारणास्तव बाहेर घेऊन गेली होती. मात्र, वातावरण गरम असल्याने मुलीला गाडीतच महिलेने ठेवले आणि गाडी लॉक करून ती निघून गेली. जाण्याआधी महिलेने कारमध्ये एसी चालू केली होती. मात्र, काही वेळाने मुलीने थंडी वाजेल म्हणून एसी बंद केली. ज्यात नंतर उष्णतेमुळे मुलीचा मृत्यू झाला.
अहवालात नमूद केल्यानुसार, आरोपी महिला जेव्हा माघारी कारमध्ये आली तेव्हा तिला तिची मुलगी मागील बाजूच्या फ्लोअरबोर्डवर पडलेली दिसली. तिला हलवले असता ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. सुमारे दीड तास ती मुलगी बंद कारमध्ये एकटीच होती. दीड तासाने महिला माघारी परतल्यानंतर तिला मुलगी मृत अवस्थेत दिसली. महिलेला तिची तोंडाला फेस येत असलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर महिने मागची खिडकी हातोडा वापरून तोडली आणि रुग्णालयात धाव घेतली.
मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर काही तासांनंतर गुरुवारी पहाटे तिला मृत घोषित करण्यात आले.रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की मुलीला हायपरथर्मियामुळे मेंदूचा त्रास झाला. त्यात तिचा मृत्यू झाला.