सांगली जिल्ह्यात भुकंपाचे धक्के जाणवले, जीवितहानी नाही

0
688

सांगली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी मोजण्यात आली आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मिरज तालुक्यातील वरनाळी येथे पहाटे ४.४७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणालीच्या 8 किलोमीटरहून अधिक परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर पडले.

आज सकाळी या भागात सौम्य भुकंम्पाचे धक्के जाणवले. या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. भूकंपाची तीव्रता जास्त नसल्याने जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (24 जुलै) पहाटे 4.47 वाजता सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र वारणावतीपासून 8 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंदवण्यात आली.
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सांगलीतील चांदोली धरण भरले आहे. या धरणावर भुकंम्पाचा कोणताही परिणाम झाला नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सांगलीत 9 जुलै रोजी भूकंप झाला होता. रात्री 7 वाजून 34 मिनिटे आणि 28 सेकंदांनी हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र सांगलीत 10 किमी खोलीवर होते