
माणदेश एक्स्प्रेस न्यूज |
निसर्ग जसा सुंदर आहे, तसाच तो भयानक आणि थरारकही असतो. हिरव्यागार जंगलात, शांत डोंगरदऱ्यांत किंवा अथांग आकाशात घडणाऱ्या काही घटना माणसाला थेट थरकापून सोडतात. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनं नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. या व्हिडीओत दिसतं की, एका प्रचंड गरुडाने विजेच्या वेगाने झेप घेतली आणि थेट एका निष्पाप हरणाच्या पिल्लावर झडप घालून त्याला आपल्या धारदार पंजांत घट्ट पकडलं.
हा व्हिडीओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारा आहे. सुरुवातीला डोंगराळ भागात उडणारा एक शक्तिशाली गरुड दिसतो. तो शिकार शोधत आकाशात फिरत असतो. अचानक खाली गवतामध्ये भटकणाऱ्या हरणाच्या एका छोट्याशा पिल्लावर त्याची नजर खिळते. क्षणाचाही विलंब न लावता तो गरुड खाली झेपावतो आणि पिल्लाच्या गळ्यावर आपल्या धारदार पंजांनी इतक्या घट्ट पकड घेतो की, पाहणाऱ्यांचा श्वासच रोखला जातो.
क्षणभरातच ते बिचारं पिल्लू हवेत लोंबकळतं आणि गरुड त्याला आपल्या दणकट पंजांत घेऊन उंच शिखरांच्या दिशेनं झेप घेतो. पिल्लू सुटण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतं, पण गरुडाच्या लोखंडी पंजांतून सुटका करणे अशक्यप्राय असतं.
हे दृश्य इतकं भीषण आणि भयावह आहे की, कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहूच नये. कारण—तो पाहताना काळजाचा ठोका चुकू शकतो. ही केवळ शिकार नाही, तर निसर्गातील निर्दय वास्तव आहे. जंगलाचा राजा जरी सिंह मानला जातो, तरी आकाशाचं खरं साम्राज्य हे फक्त आणि फक्त गरुडाचं असल्याचं या व्हिडीओनं पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.
गरुड हा Accipitridae या शिकारी पक्ष्यांच्या प्रजातीतील असून, बहिरी ससाणा, गिधाड आणि बाज हे त्याचे नातेवाईक आहेत. तो आपल्या तीक्ष्ण दृष्टीसाठी, विजेच्या वेगाने झेप घेण्यासाठी आणि धारदार नखांनी शिकार पकडण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिकार पंजात पकडल्यानंतर गरुड सर्वप्रथम तिच्या डोळ्यांवर हल्ला करतो, ज्यामुळे शिकार अर्धमेली होते आणि तिला सुटण्याची कोणतीही संधी राहत नाही.
हा व्हिडीओ आपल्याला निसर्गाचं कठोर वास्तव दाखवून जातो. जगात प्रत्येक प्राण्याची वेगळी भूमिका आहे. जसं जंगलात सिंह हा राजा मानला जातो, तसंच आकाशाचा निर्विवाद राजा म्हणजे गरुडच आहे.
The terrifying beauty of wildlife.
A Thread 🧵
1. A huge eagle carrying a "Big deer ".. 😯 pic.twitter.com/1L17jRihkL
— Crazy Moments (@Crazymoments01) August 17, 2025