ड्रामा, ॲक्शन अन् जबरदस्त क्लायमॅक्स… कसा आहे रजनीकांत यांचा ‘ नवा चित्रपट’?

0
73

माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई :
रजनीकांत हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर त्यांच्या खास स्टाइलची झलक आपोआप उभी राहते. लोकेश कनगराज दिग्दर्शित नवा चित्रपट ‘कुली’ हा त्याच जुन्या स्वॅग, दमदार डायलॉग्स आणि 80-90 च्या दशकातील मसालापटाची चव घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत असताना प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरत आहे.

कथा – बंदर, तस्करी आणि बदला

चित्रपटाची कथा एका गजबजलेल्या बंदरापासून सुरू होते, ज्याचा ताबा सायमन (नागार्जुन) याच्या हातात असतो. जहाजांच्या ये-जा व्यतिरिक्त इथे महागड्या घड्याळांची तस्करी केली जाते. या काळ्या धंद्याची सूत्रं सायमनचा विश्वासू दयाल (सौबिन शाहिर) सांभाळतो. या बंदरावर तब्बल 14,400 मजूर — म्हणजेच ‘कुली’ — काम करतात.

दरम्यान, देवराज ऊर्फ देवा (रजनीकांत) हा एका आलिशान वाड्यात राहत असतो, पण हा वाडा त्याने विद्यार्थ्यांसाठी आणि गरजूंकरिता हॉस्टेलसारखा खुला ठेवलेला असतो. त्याच्या आयुष्यात वळण येतं जेव्हा त्याचा जुना मित्र राजशेखर (सत्यराज) अचानक निधन पावतो. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण हार्ट अटॅक दिलं जातं, पण खरा रिपोर्ट देवाच्या हाती लागल्यावर त्याचा संताप उसळतो. पुढे घडणाऱ्या घटनांची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्येच जावं लागेल.

ॲक्शन, ड्रामा आणि भावनिक ट्विस्ट

‘कुली’मध्ये अॅक्शन, ड्रामा आणि थरार यांचा परफेक्ट मेळ आहे. कथा जरी परिचित वाटत असली, तरी मांडणी आणि लोकेश कनगराज यांची स्टाइल प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये असा ट्विस्ट आहे, ज्यावर थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव होतो.

आमिर खानचा पाहुणा कलाकार म्हणून केलेला कॅमियो हा चित्रपटाचा मोठा सरप्राईज आहे. त्याचं आणि रजनीकांत यांचं एकत्र दृश्य पाहताना प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला पोहोचतो. उपेंद्रच्या एण्ट्रीमुळे कथेला आणखी वेग मिळतो.

कलाकारांची कामगिरी

  • रजनीकांत – चित्रपटाचा आत्मा. त्यांची स्टाइल, डान्स, ॲक्शन आणि संवाद डिलिव्हरी आजही तितकीच प्रभावी.

  • नागार्जुन – सायमनच्या भूमिकेत प्रभावी आणि खलनायकाच्या व्यक्तिरेखेतही स्टारडम दाखवणारा अभिनय.

  • सौबिन शाहिर – दयालच्या भूमिकेत लक्षवेधक.

  • श्रुती हासन – प्रितीच्या भूमिकेत भावनिक दृश्यांमध्ये जास्त उठून दिसणारी.

  • आमिर खान – छोटा पण धमाकेदार कॅमियो.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

लोकेश कनगराज यांनी पुन्हा एकदा त्यांचा खास सिनेमॅटिक अंदाज सिद्ध केला आहे. धमाकेदार पार्श्वसंगीत, भव्य सेट्स, जलद गतीचे अॅक्शन सीक्वेन्स आणि नेत्रदीपक कॅमेरा वर्क यामुळे ‘कुली’ एक भव्य दृश्यानुभव ठरतो.

एकंदरीत मत

‘कुली’ हा पूर्णपणे रजनीकांत यांचा शो आहे. कथा कदाचित ओळखीची असू शकते, पण सादरीकरण, कलाकारांची परफॉर्मन्स आणि क्लायमॅक्समधला ट्विस्ट यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे. जर तुम्ही रजनीकांत यांचे चाहते असाल, तर हा मसालापट नक्कीच चुकवू नका.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here