
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणानं आपला जीव धोक्यात घातला आहे,याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रीलसाठी आपला जीव धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जीवघेणे स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण एनएच-344 वरील ३० फूट उंच हायवे होर्डिंगवर चढून रील करण्यासाठी आणि स्टंट करत आहे. व्हिडिओमध्ये त्याचे मित्रही खाली उभे राहून आनंद व्यक्त करताना, व्हायरल झालेल्या गाण्यावर नाचताना आणि व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण NH-३४४ वरील एका मोठ्या साइनबोर्डवर चढला, ज्यावर शहराची नावे आणि अंतर लिहले आहे. त्याने चढलेल्या बोर्डवर “सहारनपूर – ४४ किमी” असे लिहिले आहे. घटनेचे नेमके ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही, तथापि, राष्ट्रीय महामार्ग – ३४ वरील ठिकाणापासून सहारनपूर ४४ किलोमीटर अंतरावर असल्याचे साइनबोर्डवरून स्पष्ट होते, जिथे व्हिडिओ शूट केला गेला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी स्टंट करण्यासाठी धोकादायक पद्धतीने तो वर उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याचे मित्री त्याला प्रोत्साहन देत खाली उभे राहून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. यावेळी एक चुकीचं पाऊल या तरुणाच्या जीवावर बेतू शकतं.
एकानं म्हंटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का जरा हॉस्पिटलमध्ये जा मग कळेल” तर आणखी एकानं, “हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सहारनपुर में युवाओं में रील बनाने का चढ़ा खुमार, NH 344 हाईवे के बोर्ड पर चढ़ कर युवक बना रहा रील
पोल पर चढ़कर जान की परवाह किए बिना बनाई रील, रील बनाकर युवक ने की इंस्टाग्राम पर वीडियो वायरल#Saharanpur @saharanpurpol @Uppolice pic.twitter.com/XKbdRw7dYg
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) February 5, 2025