चालत्या बाईकवर स्टंट करणं पडलं महागात, आरोपीवर गुन्हा दाखल; पहा व्हिडीओ

0
9

धावत्या दुचाकीवर जीवघेणा स्टंट करणे आणि रस्त्यावरील इतर पादचारी आणि प्रवाशांच्या जीविताला संभाव्यपणे धोका निर्माण केल्याबद्दल नवगंज पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीविरोधता गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना कानपूर परिसरात घडली. घटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती चालत्या दुचाकीवर उभा राहून टायटॅनिक पोज देत प्रवास करतो आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आरोपीवर आयपीसीच्या कलम 336 अंतर्गत गुन्हा
प्राप्त माहतीनुसार, बाईक स्टंटची ही घटना नवनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगा बॅरेज परिसरात घडली. व्हिडिओच्या ऑनलाइन प्रसारानंतर, कानपूर पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 336 अंतर्गत गुन्हा नोंदवला, जो जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त, उन्नाव पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्याला 12,000 रुपयांचा दंड ठोठावला. उन्नाव येथे गुन्हा दाखल होण्याचे कारण असे की, बाईक उन्नावमध्ये नोंदणीकृत आहे.

नवाबगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना
सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) महेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, “आज सोशल मीडियावर बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवाबगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भागातील आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या व्यक्तीस तत्काळ ताब्यात घेतले आहे. व्हिडीओची दखल घेऊन त्याच्यावर आयपीसीच्या कलम 336अंतर्गत गुन्हा नोंदवलागेला आहे.” अशाच एका प्रकरणात, कानपूर पोलिसांनी यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांसमोर त्याच्या मोटारसायकलवर धोकादायक स्टंट केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला होता.

पहा व्हिडिओ: