दररोज एक सफरचंद खाल्ल्याने खरंच आरोग्य सुदृढ राहते? तज्ज्ञ काय सांगतात…वाचा सविस्तर

0
47

Apple Health Benefits: “रोज एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते” या प्रचलित ओळीप्रमाणे सफरचंद आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. सफरचंद आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने युक्त असून, सफरचंद आपल्या आरोग्याला अनेक फायदे देते.

 

 

वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांनी सफरचंदाचे अनेक फायदे सांगितले आहेत. डॉ. गुडे यांच्या मते, सफरचंद हे पौष्टिकतेचे एक शक्तिशाली साधन आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती व कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन-सी यासह भरपूर जीवनसत्त्वे असतात. ते पोटॅशियमचा एक उत्कृष्ट स्रोतदेखील आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे.

 

 

“माझ्या आयुष्यातील सर्वात…”, शेफाली जरीवालाच्या निधनाबद्दल एक्स पतीची पोस्ट; अंत्यसंस्काराला न येण्याचं कारणही सांगितलं. त्याव्यतिरिक्त, सफरचंदांमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते, वजन व्यवस्थापनात योगदान देते.

 

 

डॉ. गुडे म्हणाले की, सफरचंदांचे आरोग्यदायी फायदे त्यांच्या पौष्टिकतेपेक्षा खूप जास्त आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सफरचंदांमधील अँटीऑक्सिडंट्स, क्वेरसेटिन व फ्लेवोनॉइड्स, हृदयरोग, टाईप २ मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगासह दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात .

 

 

त्याशिवाय त्यांनी असेही म्हटले की, सफरचंदांमधील फायबरमुळे पोट भरल्याची भावना वाढवून आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन व्यवस्थापनात योगदान देते.

 

 

रोजच्या आहारात सफरचंद कसे समाविष्ट करायला हवे?

या बहुपयोगी फळाचे पूर्णपणे फायदे घेण्यासाठी, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सफरचंदांचा समावेश करण्याचा विचार करायला हवा. डॉ. गुडे म्हणाले की, स्नॅक म्हणून ताजे सफरचंद खा, सॅलड किंवा ओटमिलमध्ये सफरचंदाचे तुकडे घाला. सफरचंद तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवून, तुम्ही तुमचे एकूण आरोग्य सुदृढ करू शकता.

 

 

दिवसातून एका सफरचंदाचे फायदे तुम्ही जास्तीत जास्त वाढवू शकता का?

तुमच्या सफरचंदाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, या टिप्स विचारात घ्या:

कीटकनाशकांचा संपर्क कमी करण्यासाठी शक्य असेल तेव्हा सेंद्रिय सफरचंद निवडा. कीटकनाशकांचे कोणतेही अवशेष काढून टाकण्यासाठी सफरचंद खाण्यापूर्वी ते चांगले धुवा. सफरचंद ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये योग्य रीतीने साठवा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here