व्यायाम करताना गुडघेदुखीचा त्रास होतो? जाणून घ्या मुख्य कारण

0
230

अनेक लोकांना व्यायाम करताना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होतो आणि या त्रासमुळे त्यांना व्यायाम करणे देखील शक्य होत नाही. व्यायाम करताना जर गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर आपण काही बदल करणे आवश्यक आहेत.

बऱ्याच लोकांना व्यायाम करताना गुडघेदुखीचा त्रास होतो. यामुळे ते व्यायाम देखील करू शकत नाहीत. गुडघ्यावर शरीराचा भर पडला की, त्रास होतो.

व्यायामादरम्यान गुडघेदुखीचे मुख्य कारण योग्यपद्धतीने व्यायाम न करणे हे आहे. जर व्यायाम करताना गुडघेदुखी होत असेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात.

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स वरिष्ठ सल्लागार डॉ. अनिल रहेजा म्हणाले की, व्यायाम करताना गुडघेदुखी होणे ही एक सामान्य समस्या आहे.

सर्वप्रथम, जास्त वेळ किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे हे मुख्य कारण असू शकते. यामुळे व्यायाम करताना काळती घ्या.

तुम्ही जर गुडघ्यावर ताण येणारी व्यायाम केली, तरीही गुडघेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते, अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधा.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here