तुम्ही नियमित प्रोटीन पावडरचे सेवन करता का? जाणून घ्या दुप्षरिणाम

0
63

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की फक्त सप्लिमेंट्स वापरून आपण आवश्यक प्रोटीन मिळवू शकतो, पण तसे काहीही नाही. तुम्ही नियमित आहारातून चांगले प्रोटीन मिळवू शकता.

 

जे लोक तीव्र प्रकारचा व्यायाम करत नाही, खेळ खेळत नाही किंवा खूप जास्त शारीरिक हालचाल करत नाही, त्यांनी दररोज त्यांच्या शरीराच्या प्रत्येक दिवशीच्या वजनानुसार ०.८-०.९ ग्रॅम प्रोटीन घ्यावे. चांगली जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगली फॅट्स तुम्ही संतुलित आहाराद्वारे सहज मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन पावडरच आवश्यक आहे असे नाही.

 

 

“मासे, टोफू, चिकन अंडी, दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे, सुकामेवा, बिया(सूर्यफुल, पपई, भोपळ्याचा बिया) आणि धान्ये यांचे सेवन संतुलित आहारासाठी पुरेसे आहे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक घटक असतात, जे प्रोटिन पावडरमध्ये नसतात. जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगले फॅट्स.”

 

 

पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने मूत्रपिंडावर ताण येतो, ज्यामुळे युरियातून जास्तीचे नायट्रोजन उत्सर्जित करणे कठीण जाते. “किडनी स्टोन, अॅलर्जी, पुरळ येणे इत्यादी गोष्टींचा त्रास उद्भवतो. याशिवाय आतड्यांमधील बॅक्टेरियासुद्धा बदलतात, ज्यामुळे आतड्यांशीसंबंधित आजार किंवा कोलन कर्करोग होण्याचा धोका वाढतो.”

 

 

ज्यामध्ये साखर, आर्टिफिशिअल गोडपणा, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कमी-गुणवत्तेचे प्रोटीन टाकले जाते. “हे प्रोटीन दीर्घकालीन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. काही प्रोटीन पावडरमध्ये विशेषत: आर्टिफिशियल साखरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने अल्सरचा त्रास, अतिसार, इत्यादी समस्या जाणवू शकतात.”

 

 

“दररोज ४५-५५ ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात, जे आहारातून मिळवू शकतात. सोय-प्रोटीन प्रोडक्ट हार्मोनल पातळी बदलू शकतात. मागील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की काही पदार्थांमध्ये शिसे, आर्सेनिक, कॅडमियम, मर्क्युरी आणि बिस्फेनॉल-ए (बीपीए) हे कार्सिनोजेनसारखे जड धातू असतात. भारतात औषध निर्मितीच्या नियमांनुसार संतुलित आहार नियंत्रित नसल्यामुळे या समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.”

 

 

“प्रोटीन पावडर निवडताना त्याची गुणवत्ता, पचनक्षमता आणि त्यापासून होणाऱ्या अॅलर्जीचा विचार करावा, त्यामध्ये असलेल्या पदार्थांची सूची, प्रमाण आणि प्रमाणपत्रसुद्धा वाचावी.”