तुम्ही देखील १० मिनिटांत जेवण करता का? घाई घाईत जेवल्यामुळे शरीरावर काय होतो परिणाम

0
280

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू जेवतात, तर काही लोक प्रचंड घाई घाईने जेवतात. पण, घाई घाईने जेवण्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोक १० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात जेवण करतात. पण, त्यांची हीच सवय पचन, चयापचय आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे त्यांना माहीत नसते. झटपट जेवल्याने जरी वेळ वाचत असला तरी त्याचा दीर्घकाळापर्यंत आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

 

 

“१० मिनिटांपेक्षा कमी वेळात जेवण केल्याने पचन प्रक्रियेत आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यास लक्षणीय अडथळे निर्माण होऊ शकतात. तोंडात घास टाकताच पचन प्रक्रिया सुरू होते, जिथे घास चावल्याने अन्नाचे कण तयार होतात आणि त्यात लाळ मिसळते. लाळेत अमायलेससारखे एंजाइम असतात, जे कार्बोहायड्रेटवर पचनक्रिया (carbohydrate digestion) सुरू करतात. पण, घाई घाईने जेवताना अनेकदा घास नीट चावला जात नाही; परिणामी अन्नाचे मोठे कण पोटात जातात, ज्यामुळे अन्नाचे विघटन करण्यासाठी पोट आणि आतड्यांवर जास्त ताण येतो. परिणामी अपचन, पोटफुगी आणि आवश्यक पोषक तत्त्वांचे नीट शोषण होणे अशा समस्या निर्माण होतात.

 

“घाई घाईने जेवताना नीट न चावलेल्या घासाचे विघटन करण्यासाठी पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त जलद अन्न खाण्यामुळे आतडे-मेंदू यांच्यातील परस्पर संपर्क प्रक्रियेत व्यत्यय येतो, ज्यामुळे लेप्टिनसारखे हार्मोन्स जे पोट भरल्याचे संकेत मेंदूकडून आतड्याला पाठवले जातात ते सक्रिय होण्यासाठी २०-३० मिनिटे लागतात. परिणामी जास्त अन्न खाल्ले जाते आणि कालांतराने पोषक तत्वांचे शोषण कमी होते. जलद अन्न खाण्याच्या या सवयीमुळे अखेर लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोमसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या होऊ शकतात.”

 

जलद गतीने अन्न खाल्ल्याने “वजन वाढणे, पित्त उसळणे आणि चयापचय असंतुलन यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जलद गतीने अन्न सेवनामुळे अनेकदा घास नीट चावला जात नाही, ज्यामुळे अन्नाचे मोठे कण तसेच पोटात जातात, ज्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो आणि अपचन आणि पोटफुगी होण्याचा धोका वाढतो.”

 

जलद गतीने अन्न खाल्ल्याने आतडे-मेंदूच्या परस्पर संपर्क प्रक्रियेतही व्यत्यय येतो, ज्यामुळे तृप्ततेला चालना देणारे हार्मोनल संकेत मिळण्यास उशीर होतो, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते आणि वजन वाढण्याची शक्यता असते. “याव्यतिरिक्त अभ्यासातून असे समोर आले आहे की, “जलद अन्न खाणे आणि मेटाबॉलिक सिंड्रोम विकसित होण्याचा धोका वाढणे याच्यात परस्परसंबंध आहे, जे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्स वाढणे यांसारख्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच चांगल्या आरोग्य परिणामांसाठी हळू हळू जेवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

 

“अनेकदा उच्च ताण तणावामुळे घाई घाईने जेवण केले जाते. कारण लोकांवर अनेक कामे करण्याचा दबाव असतो किंवा खाण्यापेक्षा इतर कामांना प्राधान्य दिले जाते.” बालपणीच्या सवयी, जसे की ‘लवकर संपवा’ असे सांगणे किंवा वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यासाठी घाई घाईने जेवणे हे मोठे झाल्यानंतरही कायम राहू शकतात “टेलिव्हिजन पाहताना, काम करताना किंवा फोनवर स्क्रोल करत जेवण केल्याने किती वेळ जेवत आहोत याची जाणीव होत नाही, ज्यामुळे व्यक्ती नकळतपणे जलद गतीने अन्न खाऊ शकते.

 

लक्ष विचलित करणारे घटक दूर करा : जेवताना मोबाइल किंवा टीव्हीसारख्या स्क्रीनचा वापर बंद करा आणि फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा.

 

घास पूर्णपणे चावा : प्रत्येक घास पूर्णपणे चावा, ज्यामुळे पचन सुधारते आणि अन्नाच्या चवींचा अधिक आनंद घेता येतो.

 

घास खाण्यापूर्वी काही सेकंदाची विश्रांती घ्या : भूक आणि पोट भरल्याच्या संकेतांचे मूल्यांकन करण्यासाठी घास खाण्यापूर्वी काही सेकंदाची विश्रांती घ्या.

 

अन्नाचा मान ठेवा : शेतकर्यााच्या शेतातून तुमच्या ताटात आलेल्या अन्नाचा मान ठेवा, कृतज्ञता दर्शवा आणि अन्नाचे कौतुक करा.