जो जन्माला येतो, तो कधीतरी जाणारचं, असं थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. म्हणजेच, जो या पृथ्वीवर जन्म घेतो, त्याचा मृत्यू होणं अटळ आहे.
याबाबत गरुड पुराणात मृत्यूची अनेक रहस्य सांगण्यात आली आहेत, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असं म्हणतात की, अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला दुःखाचा सामना करावा लागतो.
अपघात, आत्महत्या, आगीत जाळणे, विष प्राशन करणे, फासावर लटकणे, सर्पदंश किंवा उपासमारीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना अकाली मृत्यू म्हणतात.
गरुड पुराणांनुसार, जर एखाद्या स्त्री (Stree) चा अकाल मृत्यू झाला कर, तिचा आत्मा भटकत राहतो. जर एखादी तरुणी किंवा गर्भवती महिलेचा अकाली मृत्यू झाला, तर ती पिशाच्चाच्या पोटी जन्म घेते.
तसेच, गरुड पुराणांमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर एखाद्या कुमारीकेचा अकाली मृत्यू झाला, तर तिचाही आत्मा भटकतो.
अकाली मृत्यूनंतर जीवात्म्याचं आयुष्य तो पूर्ण जगत नाही. तो आपल्या आयुष्याच्या अर्ध्यातच मृत्यू पावतो. त्यामुळे त्याचा आत्मा भटकत राहतो.
पुराणांमध्ये सांगितल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्यूचं चक्र ठरलेलं आहे. जर वेळेपूर्वीच तिचा अकाली मृत्यू झाला तर, ते चक्र बाधित होतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही. त्यांचा आत्मा भटकतो.
ज्यावेळी त्यांच्या आयुष्याचं चक्र पूर्ण होतं, त्यानंतरच ते दुसरा जन्म घेतात.
स्त्रियांवर अत्याचार करणारे, त्यांचे शोषण करणारे, खोटं बोलणारे किंवा कुकर्म करणाऱ्यांचा अकाली मृत्यू होतो, असंदेखील गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. मानदेश एक्स्प्रेस यातून कोणताही दावा करत नाही. )