
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग व आत्महत्येच्या गंभीर प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांच्या नावाने पैसे मागितल्याचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे रेकॉर्डिंग महेश नामक तरुणाचे असून, तो गेल्या काही दिवसांत पोलिसांविरोधात आंदोलनाच्या आघाडीस राहिलेला असून त्याच्याविरुद्ध
पीडित मुलीच्या आत्महत्येमागे लैंगिक अत्याचाराचा प्रकार आणि त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली असून तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणाचा गैरफायदा घेत आरोपींना वाचवण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची मागणी करणारा रॅकेट उघड झाला आहे.
महेश नामक व्यक्तीने आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांचा हवाला देत पैशांची मागणी केल्याचा स्पष्ट उल्लेख या रेकॉर्डिंगमध्ये आहे. शिवाय या आरोपींशी संबंधित बड्या राजकीय नेत्यांशी असलेले संबंध देखील यामध्ये स्पष्ट होत आहेत.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील व युवा सेनेचे तालुका प्रमुख मनोज नांगरे यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत, “माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा उद्योग काही लोक करत आहेत,” असा आरोप केला आहे.
या महेश नामक व्यक्तीचे कोणत्या पक्षाशी संबंध आहेत? त्याचे कोणत्या नेत्यांबरोबर फोटो आहेत? तसेच तो कोणाच्या छत्रछायेखाली कार्यरत आहे? याची सखोल चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या कासाई बेकरीचे उद्घाटन कोणत्या नेत्याच्या हस्ते झाले? तो कोणाचा कार्यकर्ता म्हणून मिरवत होता? याचे पुरावेही समोर आले आहेत. आरोपी आणि महेश या दोघांचेही काही भाजपा नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे सोशल मीडियावरील विविध फोटोंतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करावा असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “करगणी प्रकरणात शिवसेना सुरुवातीपासूनच पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय अभय देऊन सौदेबाजी करणाऱ्यांना समाज उघड करत आहे.