वारीतील नितेश राणेंनंतर आता अगदी फडणवीसांचा जुळा चेहरा आला समोर, Video पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न, खरा कोण?

0
327

Devendra Fadnavis Duplicate Viral Video:
“जगात प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा असतो,” असं आपण नेहमी ऐकत आलोय. मात्र, याला छेद देणारी घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावर गाजू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी नितेश राणेंचा हुबेहूब डुप्लिकेट समोर आल्यानंतर आता अगदी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डुप्लिकेट समोर आल्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओत नितेश राणेंचा डुप्लिकेट दिनेश पवार आणि फडणवीसांचा डुप्लिकेट एकत्र दिसत आहेत. हे दोघे शेजारी उभे राहिल्याने क्षणभर खरी व्यक्ती कोण आणि डुप्लिकेट कोण, याचाच गोंधळ उडालेला दिसतो. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर नितेश राणेंचा हुबेहूब डुप्लिकेट समोर आला होता. मंदिरांमध्ये गंधाचे ठसे तयार करण्याचे साधंसरळ काम करणारा दिनेश पवार हा तरुण एका क्षणात प्रसिद्ध झाला होता. त्याच्या साध्या राहणीमानानं अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं.

गंमत म्हणजे आता अचानक समोर आलेला फडणवीसांचा डुप्लिकेट चेहऱ्याप्रमाणेच हसण्यात, बोलण्यातही फडणवीसांशी साम्य दर्शवतो. त्यामुळे नेटकरी अक्षरशः गोंधळले आहेत. कुणी मजेत त्याला “फडणवीसांचा हरवलेला जुळा भाऊ” म्हणत आहे, तर कुणी थेट “राजकारणात उतरण्याचा सल्ला” देतोय. तर काहींनी कमेंटमध्ये चिमटा काढत, “खऱ्या फडणवीसांपेक्षा हा जरा जास्तच हसतमुख दिसतो” असं लिहिलं आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठे शूट झाला याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी तो मुंबईतील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या डुप्लिकेट्सची जोडी एकत्र आल्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. “हे जर अचानक समोर आले तर खरा कोण आणि हुबेहूब डुप्लिकेट कोण?” हा प्रश्न अनेकांना पडत आहे.

नितेश राणेंनंतर आता फडणवीसांचा डुप्लिकेट समोर आल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पुढे अजून कोणत्या राजकीय नेत्याचा डुप्लिकेट समोर येतो, याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये वाढली आहे. एक मात्र नक्की – अशा घटनांमुळे नेत्यांच्या प्रतिमेसोबतच त्यांच्या डुप्लिकेट्सचीही सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रियता वाढत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here