‘देवमाणूस’ परत येतोय! लवकरच सुरु होणार नवा अध्याय; प्रोमो आला समोर

0
62

छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आणि दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘देवमाणूस’ मधील डॉ. अजितकुमार देव भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याशिवाय सरू आजी, मंगल ताई, टोन्या, डिंपल, बज्या, नाम्या, रेश्मा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग या पात्रांनी प्रेक्षकांचं भरभरुम प्रेम दिलं. आता या मालिकेबाबत नवी माहिती समोर आली आहे.

 

 

‘देवमाणूस’ मालिकेचे दोन भाग पाहायला मिळाले. आता लवकरच किरण गायकवाडची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीने ‘देवमाणूस’ मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच..

 

 

आपल्या झी मराठीवर!” असं कॅप्शन देत वाहिनीकडून मालिकेच्या आगामी भागाबद्दल संकेत दिल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या पात्रांचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सोशल मीडियावर ‘देवमाणूस’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेत अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत होता. संपूर्ण मालिकेचं कथानक त्याने साकारलेल्या पात्रावर आधारित होतं. त्यामुळे या आगामी भागात अभिनेता प्रेक्षकांना दिसणार की नाही, याबाबत मालिका रसिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here