सांगली लोकसभेमध्ये “या” उमेदवारांचे डिपॉझिट जप्त ; डिपॉझिट जप्त झालेल्यामध्ये दिग्गज उमेदवारामध्ये माजी आमदारांचाही समावेश

0
11

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली लोकसभेचा मतदार संघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. परंतु त्यांच्या विजयातील अंतरामुळे एकूण 18 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, स्वाभिमानीचे महेश खराडे यांचा समावेश आहे.

 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून अर्ज भरण्यासाठी 25 हजार रुपये आणि एसटी, एससी गटातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. त्यानुसार 20 उमेदवार डिपॉझिट भरून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

 

निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीत एकूण मताच्या 16.66 टक्के मते मिळणे गरजेचे आहे. ही मते मिळविण्यात अयशस्वी झालेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. जिल्ह्यात 11 लाख 70 हजार 314 मतदान झाले होते. त्यामुळे 1 लाख 94 हजार 974 पेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

 

त्यानुसार जिल्ह्यात 18 जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. त्यामध्ये चंद्रहार सुभाष पाटील (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे), टिपू सुलतान सिकंदर (बहुजन समाज पार्टी), आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी), महेश यशवंत खराडे (स्वाभिमानी), पांडुरंग रावसाहेब भोसले (भारतीय जवान किसान पार्टी), सतीश लतिता कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), अजित धनाजी खंडादे (अपक्ष), अल्लाउद्दीन हयातचांद काजी (अपक्ष), डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (अपक्ष), जालिंधर मच्छिंद्र ठोमके (अपक्ष), तोहीद इलाही मोमीन (अपक्ष), दत्तात्रय पंडित पाटील (अपक्ष), नानासाो बाळासाो बंडगर (अपक्ष), रवींद्र चंदर सोलनकर (अपक्ष), शशिकांत गौतम देशमुख (अपक्ष), सुवर्णा सुधाकर गायकवाड (अपक्ष), संग्राम राजाराम मोरे (अपक्ष) या 18 जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.