प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा, कारागृहाच्या पत्यावरच पाठवली नोटीस

0
62

माणदेश एक्सप्रेस/कोल्हापूर: महापुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणे या प्रकरणात सद्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. इंद्रजित सावंत यांनी कारागृहाच्या पत्यावरच कोरटकरला ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आज न्यायालयात कोरटकरच्या जामीनावर सुनावणी होत असतानाच अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याने जामीन मिळणार की कोठडीतील मुक्काम वाढणार हे पाहावे लागणार आहे.

 

न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास संशोधक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आणि सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत व त्यांना अटक झाली होती इत्यादी खोटी माहिती लिहिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप त्यांनी न्यायालयात केल्यावर प्रशांत कोरटकर तर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते.

 

 

ॲड. योगेश सावंत यांनी स्वतः कोल्हापूर कारागृहात जाऊन इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आरोपी प्रशांत कोरटकर याला अब्रुनुकसानीची नोटीस जेलर अविनाश भोई यांच्या हस्ते देण्यात आली.

 

याआधी कोर्टाने प्रशांत कोरटकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान कोरटकरने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. कोरटकरला व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here