सोशल मिडिया इंफ्लुएंसर अन्वी कामदार चा मृत्यू; इंस्टाग्राम रील बनवताना दरीत पडली

0
261

यंदाच्या पावसाळ्यात विविध अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल पोस्ट्समुळे चर्चेत असलेली अन्वी कामदार हिच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. मुंबईजवळील रायगडमध्ये अन्वीचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती व या आवडीला तिला आपले करिअर बनवले होते. आज रायगडमधील कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत असताना अन्वीचा अपघात व त्यात तिचा मृत्यू झाला. अन्वी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन रील शूट करत होती. त्याचवेळी व्हिडीओ काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला व ती थेट 350 फूट खोल दरीमध्ये पडली. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तिच्यापर्यंत पोहोचली व तिला जखमी अवस्थेमध्ये माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अन्वी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अन्वी कामदार पावसाळ्यात कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी आली होती.

पहा पोस्ट-