“दौंडने तुम्हाला खूप काही दिलं… आता त्या मातीचा मान ठेवा!” – सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना भावनिक आवाहन

0
32

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात एक धगधगतं आणि भावनिक वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. दौंडमध्ये वाढत चाललेला तणाव, गुंतवणुकीला अडथळा निर्माण करणारी दादागिरी, आणि पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांतील वाढती गुन्हेगारी यावरून त्यांनी राज्य सरकारला आणि प्रशासनाला थेट जाब विचारला. “दौंडने तुम्हाला खूप काही दिलंय, आता त्या मातीचा मान ठेवा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

 

“गुंतवणुकीला अडथळा कोणामुळे?”

सुप्रिया सुळे म्हणाल्या,

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच नुकतीच कबुली दिली की गुंतवणूक येत नाही. मी त्यांच्या प्रामाणिकतेचं स्वागत करते. पण गुंतवणूक येत नाही ती कोणाच्या दादागिरीमुळे? हे मुख्यमंत्री सांगणार का? कंत्राटदारांच्या मागे कोण आहे, हे सरकारने स्पष्ट करावं.”

 

त्यांच्या या वक्तव्यानं पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेपाची झळ सरकारपर्यंत नेली आहे.”गुन्हेगारांना वर्दीची भीती राहिलेली नाही!” पुण्यासह बीड, अहमदनगर, आणि इतर काही भागात गुन्हेगारी वाढल्याचं स्पष्ट करत सुळे म्हणाल्या,

 

“लोक न्यायासाठी रडत आहेत. पोलिस खात्याची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. गुन्हेगार उघडपणे दहशत माजवत आहेत. सरकार कोणाच्या दबावाखाली आहे? गृहविभाग यावर उत्तर देणार का?”

 

 

“दौंडमधील तणाव गंभीर… बाहेरून आलेल्यांना आवरा”

दौंडमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट शब्दात सांगितलं –

“दौंडने अजित पवारांना खूप प्रेम दिलंय. माझी विनंती आहे की, ही माती सगळ्यांना संधी देते, पण बाहेरून आलेले काहीजण जर इथं गोंधळ घालत असतील, तणाव वाढवत असतील, तर तुम्हीच पुढे येऊन त्यांना आवरा. दौंडमध्ये शांती, समंजसपणा टिकवणं ही आपली जबाबदारी आहे.”

 

 

“पुण्याचं काय चाललंय?”

“गुन्हेगारी, बिल्डर लॉबी, राजकीय दहशत – हे सगळं पुण्यात खुलेआम चालतंय. गुंतवणूकदार घाबरतोय, सामान्य नागरिक असुरक्षित आहे. पुण्याचं काय चाललंय, हे कोणी तरी सांगणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here