दिघंचीत धोकादायक होर्डिंग ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

0
13
फोटो :दिघंची गावच्या मुख्य चौकातील इमारतीवर असणारे धोकादायक स्थितीतील होर्डिंग
फोटो :दिघंची गावच्या मुख्य चौकातील इमारतीवर असणारे धोकादायक स्थितीतील होर्डिंग

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : अवकाळी पावसाने व वाऱ्यामुळे मुंबई येथील हायवे वरील भले मोठे होर्डिंग कोसळून १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर होर्डिंगकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे सध्या असेच धोकादायक स्थितीत असलेले होर्डिंग हे दिघंची गावच्या मुख्य चौकातील इमारतीवर आहे. या ठिकाणी प्रवाशी संख्या मोठी असून आटपाडीला जाण्यासाठी नेहमीच या ठिकाणी गर्दी असते. या होर्डिंग वरील असणारी जाहिरात वाऱ्याने अर्धे फाटली आहे. जर पुन्हा वादळी वारे आल्यास या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे लक्ष देत सदरच्या होर्डिंग वर असणारी अर्ध्या स्थितीत असलेले जाहिरात काढून टाकून होर्डिंग वरील बोजा कमी करून होर्डिंग पूर्ववत करावे अशी आशा सामाजिक कार्यकर्ते सनी कदम यांनी व्यक्त केली.

आटपाडी तालुक्याला दिनांक १६ रोजी वादळी वारे व पावसाचा जोरदार फटका बसला. यामध्ये विभूतवाडी येथील शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर हिवतड येथील घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते.