
माणदेश एक्सप्रेस/सांगली: सांगलीतील कुपवाडमधील प्रकाशनगर येथे ३८ वर्षीय राहुल सूर्यवंशी याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लोखंडी रॉडने मारहाण करून आणि दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीचा वारंवार छळ करीत होता. त्याला अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी सौरभ सावंत (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे