गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर; पण सेवन करण्यापूर्वी त्याचे फायदे, तोटे जाणून घ्या

0
164

Health Benefits of Consuming Jaggery : गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेदातही गुळाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आहारात समावेश करतात. पण, भारतात गुळाऐवजी साखरेचे सेवन करणा्ऱ्यांची संख्या अधिक आहे. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक प्रकारे आपण साखरेचे सेवन करीत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? याच विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसने काही आरोग्यतज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली आहे.

 

नोएडातील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितले की, गुळाकडे आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहिले जाते. पण, त्याचे सेवन करण्यापूर्वी फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.

 

साखरेपेक्षा गूळ फायदेशीर का?
गूळ हा फक्त गोड पदार्थ नाही, तर तो पोषक घटकांचा एक मुख्य स्रोतदेखील आहे. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम हे घटक असतात. त्यामुळे साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास तुम्ही गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण करू शकता; पण त्याशिवाय गुळाद्वारे तुम्हाला शरीरास आवश्यक खनिजेही मिळतील.
पण इतकेच नाही, तर मेहरा यांच्या मते, गूळ खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

१) पाचक एंझाइम्स उत्तेजित करून पचनक्रिया सुधारू शकता.

२) शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

३) अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांसह रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते.

४) रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

५) शरीरास आवश्यक ऊर्जा मिळते. तसेच रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध होतो आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

 

गूळ सर्वांसाठी आरोग्यदायी पर्याय आहे का?
मेहरा म्हणाले की, गुळात साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असले तरी त्यात कॅलरीज जास्त प्रमाणा असतात.

१) मधुमेहींनी गुळाचे सेवन करताना सावधानता बाळगली पाहिजे; जरी गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रिफाइंड साखरेपेक्षा कमी असला तरी. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुमच्या आहारात गूळ वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

२) सर्व प्रकारचा गूळ शुद्ध नसतो. व्यावसायिकरीत्या प्रक्रिया केलेल्या अनेकविध गुळामध्ये रसायने किंवा वेगवेगळे पदार्थ असतात. त्यामुळे आरोग्यासाठी असलेला धोका टाळण्यासाठी मेहरा यांनी सेंद्रिय किंवा नैसर्गिकरीत्या प्रक्रिया केलेला गूळ निवडण्याचा सल्ला दिला आहे.

 

४) काही लोकांना गुळाच्या सेवनाने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही असा काही त्रास ना याची माहिती करून घ्या. गुळाच्या सेवनाने पचनासंबंधित त्रास होऊ शकतो. त्वचेसंबंधित किंवा श्वसनासंबंधित समस्या जाणवू शकतात.

 

जर तुम्ही साखरेला अधिक पौष्टिक पर्याय शोधत असाल, तर गूळ हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण, त्याचेही फक्त माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे. मेहरा म्हणतात त्याप्रमाणे, साखरेच्या जागी गूळ घेणे फायदेशीर ठरू शकते; परंतु तोही अजूनही साखरेचा एक प्रकार आहे. त्यामुळे संतुलित आहाराची निवड करणे आणि प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ निवडणे आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here