
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य विशेष
आपल्या दैनंदिन आहारात थोडा बदल केल्यानं आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. असाच एक आरोग्यदायी बदल म्हणजे बीटचा समावेश. बीट हे केवळ लालसर रंगाचं मूळभाजीतलं भाजीपाला नसून, एक ‘सुपरफूड’ आहे. यामध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी6, सी आणि ए यांसारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. बीट नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील अनेक समस्या दूर होतात.
बीटचे आरोग्यदायी फायदे
त्वचेसाठी वरदान: बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करून त्वचा घट्ट आणि मऊ ठेवण्यास मदत करते.
रक्त वाढवते: शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर बीट हे एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. त्यातील लोह रक्त वाढवण्यास मदत करते.
मेंदू व मूड सुधारतो: बीटमध्ये असलेले नायट्रेट्स मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतात, ज्यामुळे मेंदू तीव्र बनतो. बेटेन नावाचा घटक मूड सुधारतो व नैराश्यावर नियंत्रण ठेवतो.
पचन सुधारते, कर्करोगावरील लढा: फायबरने भरपूर बीट पचनसंस्था सुधारते. बीटातील बेटानिन घटक कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढा देतो. संशोधनानुसार, बीटाचा रस स्तन, पोट आणि आतड्यांतील कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करतो.
लिवरचे संरक्षण: अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लिवरमधील सूज कमी करतात व लिवर निरोगी ठेवतात.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर: बीट गर्भाशयातील बाळाच्या विकासात मदत करते व स्पायना बिफिडा आजाराला प्रतिबंध करते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवतो: बीटमधील नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईड वायू निर्माण करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
दृष्टी सुधारते आणि वजन कमी करते: बीटमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, त्यातील फायबर आणि कमी कॅलरीजमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
बीट खाण्याचे 6 सोपे मार्ग
सॅलडमध्ये – कच्चे चिरून, थोडं मीठ-लिंबू टाकून सॅलडमध्ये खा.
बीटचा हलवा – गाजरासारखाच चविष्ट हलवा बनवता येतो.
बीट पराठा – पीठात किसलेलं बीट घालून स्वादिष्ट आणि पौष्टिक पराठा बनवा.
शिंकजी किंवा डिटॉक्स ड्रिंक – बीटचा रस लिंबूसह मिसळून शिंकजी किंवा डिटॉक्स ड्रिंक तयार करा.
रिकाम्या पोटी रस – सकाळी बीटचा रस रिकाम्या पोटी घेतल्याने उत्तम फायदा होतो.
सूप किंवा भाजी स्वरूपात – बीटचा गरम सूप किंवा हलकी भाजी देखील पौष्टिक ठरते.