
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी महायुतीतर्फे ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन केले होते. या यात्रेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा” ,अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीतर्फे घेण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवर टीका केली खासदार राऊत म्हणाले, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला. या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का? ते निवडणूक आयोगालाMumbaiहातात धरून पक्ष ताब्यात घेण्या इतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. (स्त्रोत-लोकमत)