‘काय तो डान्स अन् काय ते एक्सप्रेशन्स…’, ‘या’ मराठी गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तू पण ..”

0
110

Viral Video: गणेशोत्सव जरी संपला असला सोशल मीडियावर मात्र गणेशोत्सवातील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात बाप्पाच्या सुंदर मूर्ती, सजावट अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात. याशिवाय गौराईच्या सुंदर साज-श्रृंगाराचे, आमगनाचेही अनेक व्हायरल होत आहेत. याचदरम्यान, अनेक महिला, तरूणी आणि लहान मुलींचेही गौराईच्या आमगनदरम्यानचे सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

 

हल्लीची लहान मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावही कमालीचे आहेत. यावेळी तिच्या मागे बाप्पाची सुंदर मूर्ती आणि दोन गौराईदेखील दिसत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “खूप गोड आहे ही मुलगी” तर आणखी एकाने लिहिलंय की, “बाळा तू पण गौराई आहेस” तर आणखी एकाने लिहिलंय की, “गौराईच्या गाण्यावर सुंदर डान्स.”

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here