
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : रंगपंचमी हा उत्साहाचा आनंदाचा आणि सर्वांच्या आवडीचा सण ! या दिवशी लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकजण रंगामध्ये रंगून जातो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठेनगर येथे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मोठ्या उत्साहामध्ये रंगपंचमी साजरी केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत विविध रंग, पिचकारी, कलर गन असे साहित्य सोबत आणले होते. विविध गाण्यावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी मनसोक्त रंगपंचमी साजरी केली. आपल्या लाडक्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी रंग लावल्यावर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि जिव्हाळा दिसत होता.
प्रत्येक जण रंगामध्ये रंगून गेला. ना कसला भेदभाव, ना लिंग भेद, ना गरीब ना श्रीमंत प्रत्येक जण प्रत्येक जण एकतेच्या आणि समतेच्या रंगात मिसळून गेले. अशा उत्साही सणांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्ट होण्यास मदत होते. शालेय अध्ययन अध्यापनात शिक्षक आणि विद्यार्थी समरस होणे हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हितकारक ठरते.