
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मच्छिंद्र मारुती गोडसे (वय ५५, रा. मापटे मळा) व विवेक संतोष सरतापे (वय २५, रा. बालटे वस्ती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.
सदर व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करून अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क) सह २७ (NDPS Act) चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यासंदर्भात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश आवळे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.