माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये काल दिनांक २० रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. मतदानाची अंतिम टक्केवारी आता समोर आली असून मतदार संघामध्ये एकूण ७१.२७ टक्के मतदान संपन्न झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दिली. आज मतमोजणी विटा येथे सुरु आहे.
उमेदवार निहाय नववी फेरीतील मतदान
१) अजित खंदारे :- २१८
२) बाबर सुहास :- ८२८२४
३) राजेश जाधव :- ३७९
४) वैभव पाटील :- ४४५३१
५) उमाजी चव्हाण :- ३१०
६) भक्तराज ठिगळे :- १२६
७) संग्राम माने :- ५६६
८) उत्तम जाधव :- ३१
९) अंकुश चवरे :- ४१
१०) दादासो चंदनशिवे :- ६९८
११) भारत पवार :- ७६
१२) राजेंद्र देशमुख :- ६४४
१३) संतोष हेगडे :- ७०
१४) संभाजी पाटील :- २१३
१५) NOTA :- ३५२
एकूण १३१०७९
खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३५०९९६ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार हे १७७५४२ असून स्त्री मतदार हे १७३४३५ मतदार आहेत असून इतर १९ मतदार आहेत. काल झालेल्या सकाळी ७.०० ते ६.०० च्या दरम्यान एकूण २५०१६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १२७८५२ पुरुष, १२२२९४ स्त्री तर इतर १४ अशा एकूण २५०१६० मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी ७१.२७ आहे.
खानापुर विधानसभा मतदार संघात, महायुती कडून सुहास बाबर, महाविकास आघाडी कडून वैभव पाटील तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने, या ठिकाणी निवडणीत मोठी रंगत आली आहे. प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते नागरिकांना मतदान करण्यासाठी आणत आहेत. आटपाडी तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.