बुमराहचे आयपीएलमध्ये पुनरागमन

0
81

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची आहे. मुंबई संघाचा मुख्य खेळाडूंपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे. तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये सामील झाला आहे. ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. तथापि, बुमराह आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकेल की नाही याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. या घटनेची माहिती मुंबई इंडियन्सने त्याच्या सोशल मिडीया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

 

पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर, बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सराव करत होता, जिथून अलिकडच्या एका अहवालात म्हटले आहे की, त्याच्या पुनरागमनाबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. पण आता बातमी आली आहे की बुमराह मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. बुमराह सामना खेळत असल्याबद्दल, सध्या त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, तो १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकतो असे मानले जाते.

 

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा विश्वासू वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या कामगिरीने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत १३३ सामन्यांत १६५ बळी घेतलेले बुमराह मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचा बळी मिळवण्याचा सरासरी दर २२.५२ असून त्याने २३ वेळा तीन बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५ बळी केवळ १० धावांत आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने ज्या हंगामांमध्ये विजेतेपद मिळवले – २०१७ (२० बळी), २०१९ (१९ बळी) आणि २०२० (२७ बळी) – त्या प्रत्येक वेळी बुमराह संघाचा प्रमुख यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्या दमदार आणि अचूक माऱ्यामुळेच मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here