BSE चं मार्केट कॅप ‘एवढ्या’ कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी

0
82

माणदेश एक्सप्रेस न्यूज
मुंबई : मुंबई शेअर बाजार (BSE) १ लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बाजार भांडवल असलेल्या निवडक कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंजचं मार्केट कॅप बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये प्रथमच १ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलं. राष्ट्रीय शेअर बाजारवर (NSE) बीएसईच्या शेअरची किंमत ७,४२२.५० रुपयांच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचली.

 

बुधवारी एनएसईवर बीएसई लिमिटेडचा शेअर १.५ टक्क्यांनी वधारून ७,४२२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ३ ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये १३% वाढ झाली आहे. बोनस शेअरच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.२३ मे २०२५ ही बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट आहे.

 

गेल्या महिन्यात बीएसईनं निफ्टी ५० च्या ६% तुलनेत ३१% वाढ दर्शविली. मार्च २०२४ मध्ये ३,६८२ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर १०२ टक्क्यांनी वधारला आहे. तर २३ जुलै २०२४ रोजी २,११५ रुपयांच्या २ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून शेअर २५१ टक्क्यांनी वधारलाय.

 

बीएसईनं भागधारकांना प्रति शेअर २३ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी १४ मे ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. यात ५ रुपयांचा ‘स्पेशल डिव्हिडंड’ (बीएसईची १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) आणि १८ रुपयांचा नियमित लाभांश यांचा समावेश आहे. २३ मे २०२५ ही १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड डेट आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here