ब्रेकिंग : महूद : बंडगरवाडी नजीक ट्रकने महिलांना चिरडले ; पाच महिला जागीच ठार ; दोन गंभीर जखमी

0
105
फोटो : महूद (बंडगरवाडी) येथे अपघातानंतर घटनास्थळी झाल्लेली गर्दी
फोटो : महूद (बंडगरवाडी) येथे अपघातानंतर घटनास्थळी झाल्लेली गर्दी

माणदेश एक्सप्रेस न्युज/ महूद : बंडगरवाडी ता. सांगोला जि. सोलापूर येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर २० चाकी ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर दोन महिला मजूर जखमी झाल्या. ही घटना आज (दि.१८) दुपारी घडली. या सर्व महिला कटफळ (ता. सांगोला) येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर – कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बंडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहुद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम संपून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या. यावेळी अचानक पंढरपूरहून २० चाकी मालवाहतूक ट्रक (एमएच ५० एन ४७५७) वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतमजूर महिलांच्या दिशेने भरधाव गेला. यात ५ महिला मजूर ठार झाल्या. तर २ जखमी झाल्या. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.

इंदुबाई बाबा इरकर (वय ५०), भिमाबाई लक्ष्मण जाधव (वय ४५), कमल यल्लाप्पा बंडगर (वय ४०), सुलोचना रामा भोसले (वय ४५), अश्विनी शंकर सोनार (वय १३) जागीच ठार झाल्या. तर मनीषा आदिनाथ पंडित (वय २५), मिनाबाई दत्तात्रय बंडगर (वय ५०) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली असून, जखमीवर तात्काळ योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here