ब्रम्हानंद पडळकर यांचा दणका ; डॉक्टरचे निलंबन ; सर्पदंशाने झाला होता चिमुकल्याचा मृत्यू

0
33

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : विटा तालुक्यातील साळशिंगे येथील शेतात मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या समर्थ रावसाहेब कोलेनाड या अडीच वर्षाच्या बालकाचा विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. संर्पदंश झालेला असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याने या बालकाला आपले प्राण गमवावे लागले होते.

या प्रकारावर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित दोषी डॉक्टरांवर कारवाई न केल्यास व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या प्रकरणाबाबत विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
परंतु या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण देशचौगुले यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केली आहे.

बालकाच्या मृत्यू झाल्यानतर विटा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला जात होता. घटनेनंतर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, यांनी ग्रामीण रुग्णालयात येवून जाव विचारत सदर प्रकरणी डॉक्टरावर कारवाई करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु आज ब्रम्हानंद पडळकर यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर भूषण देशचौगुलेचे निलंबन करण्यात आले आहे.