हिंदू कुटुंबात जन्म, मुस्लिम अभिनेत्याशी लग्न, पण या अभिनेत्रीचा ख्रिश्चन धर्माशी काय संबंध?

0
174

माणदेश एक्सप्रेस न्यूज : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटापेक्षाही त्यांच्या वैयक्तिग आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसते. तसेच त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असते. त्यातीलच एकप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान. करीनाने हिंदू कुटुंबात जन्माला येऊन दुसऱ्या धर्मात लग्न केले. कपूर कुटुंबातील लाडक्या कपूरने घटस्फोटित मुस्लिम अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. लग्नानंतर, अभिनेत्री देखील मुस्लिम धर्माशी जोडली गेली. मात्र हे फार कमी जणांना माहित आहे की, करीना ख्रिश्चन धर्माशी देखील जोडलेली आहे. हे तिच्या जवळच्या एका महिलेनेच खुलासा केला.

 

 

बबिता या त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी राज कपूर यांचे मोठे पुत्र आणि अभिनेते रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं. रणधीर पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. तर बबिताने लग्नानंचरही ख्रिश्चन धर्माचे पालन केले. लग्नानंतर दोघेही करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोन मुलींचे पालक झाले . हिंदू कुटुंबात जन्माला येऊन मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करण्याव्यतिरिक्त, करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्माचेही विशेष स्थान होते. करीनाचा या धर्माशी असलेला संबंध ललिता डिसिल्वा हिने एका मुलाखतीदरम्यान उघड केला. ललिता डिसिल्वा या करीनाचा मोठा मुलगा तैमूर अली खान यांना सांभाळणारी त्यांची आया आहे.

 

 

ललिता करीनाबद्दल म्हणाली होती की, “करीना कपूर ख्रिश्चन धर्मावरही फार विश्वास ठेवते, पण ती मला म्हणायची की ‘जर तुम्हाला भजन वाजवायला आवडत असेल तर भजन वाजवा’. मी त्यांच्यासाठी (तैमर आणि जेह) साठी भजन गायचे. मग करीना म्हणायची की पंजाबी भजन, एक ओंकार, ती तेच पाळत असे, म्हणून ती तेच वाजवत असत. कारण तिला माहित आहे की मुलांभोवती सकारात्मकता असणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, ती तुमची निवड आहे… पण जर तुम्ही सुरुवातीपासूनच मुलांना सकारात्मक भावनांचा प्रभाव दिलात तर ती सकारात्मकता त्यांच्याकडे आपोआप येते.” तर अशा पद्धतीने करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्मालाही तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here