दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल आल्यानंतर खळबळ उडाली होती. कॉल केलेल्या व्यक्तीने आपण बसने प्रवास करत असताना दोन व्यक्तींचं बोलणं ऐकलं आणि ते McDonald उडवण्याबद्दल बोलत होते. पोलिसांनी या कॉल नंतर संपूर्ण भागाची तपासणी केली मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.