ब्रेकिंग : करगणीत युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला; आटपाडी तालुक्यात खळबळ

0
2209

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आज सकाळी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. करगणी-खरसुंडी रस्त्यालगत एमएसबी ऑफिसजवळ हा मृतदेह सापडला.

 

मृत युवकाची ओळख करगणी येथील रहिवासी शंकर निळे अशी झाली आहे. सकाळी स्थानिक नागरिकांना रस्त्यालगत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही घटना अपघात आहे की अन्य काही कारण, याचा तपास सुरू आहे.

 

दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे करगणीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here