खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर

0
359

माणदेश एक्स्प्रेस/सांगली : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपने पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विशाल पाटलांनी भाजपत यावे, यासाठी सारखं म्हणत राहणार. काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असतानाच पाटलांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

 

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. ते तरुण आणि हुशार आहेत. त्यामुळे मी हे सारखं म्हणत राहणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

 

“विशाल पाटील यांनी भाजपमध्ये यावं. पण, ते अपक्ष असल्यामुळे पार्टीमध्ये येता येत नाही. त्यांना सहभागी व्हावं लागेल. ते तरुण आहेत. हुशार आहेत. खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे. त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा, यासाठी सारखं म्हणत राहणार”, असे चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

 

खासदार विशाल पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा विधान केले आहे. मार्च महिन्यातही चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करून चालावं लागतं. त्यामुळे विशाल पाटील भाजपसोबत आले, तर भाजपाचे केंद्रातील संख्याबळ वाढेल आणि सांगलीच्या विकासालाही चालना मिळेल.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here