यांच्या काळात ग्रामपंचायतच विकायची राहिली होती : ब्रम्हानंद पडळकरांचा स्फोटक आरोप

0
923

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत निवडणुकीची रणधूमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून शहरातील प्रत्येक नागरिक जागृत झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या बाजूने स्पष्ट कल निर्माण झाल्याचा दावा करत भाजप नेते ब्रम्हानंद पडळकर यांनी प्रचारसभेत मनोगत व्यक्त केले. बापूसाहेबांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रचार मोहीमेने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत बोलताना त्यांनी सध्याच्या उमेदवारांवर तीक्ष्ण टीका केली. “पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायत विकायचीच राहिली होती… आणि आता पुन्हा जनतेसमोर येत आहेत,” अशा शब्दांत पडळकर यांनी आरोपांचा भडीमार केला. तसेच “रावसाहेब सागर हे फक्त नामधारी उमेदवार आहेत,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विकासकामांसाठी निधी अभावी कोणतीही अडचण येणार नाही, अशी हमी देत पडळकर म्हणाले, “ही आमची शेवटची सभा… पण विकासाची वाट रोकली जाणार नाही. जनतेने निश्चिंत राहावे.”

पुढे अमरसिंह देशमुख यांच्याकडे निर्देश करत ते म्हणाले, “कार्यकर्त्यांची बैठक घेणे गरजेचे आहे. कोणताही कार्यकर्ता गाफील राहू नये. प्रत्येकाने निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरत आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here