“सिंगल लोकांसाठी सर्वांत मोठे डिस्काउंट” रिक्षाचालकाने प्रवासासाठी दिली ‘ही’ भन्नाट ऑफर; मजेशीर VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

0
133

Single People Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यावेळी एका रिक्षाचालकाच्या मजेशीर ऑफरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात बसणाऱ्या सिंगल लोकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. सिंगल म्हणजे असे लोक जे कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाहीत असे लोक. याच लोकांचा विचार करून रिक्षाचालकाने ही ऑफर दिली आहे, ज्यामुळे कमी पैशात सिंगल लोकांना त्याच्या रिक्षातून प्रवास करताना येणार आहे.

 

रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात बसलेल्या सिंगल लोकांसाठी दिलेल्या या ऑफरमध्ये लिहिले की, प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांसाठी १० रुपये आणि प्रेमी युगलांसाठी पाच रुपये अधिक म्हणजेच १५ रुपये, असं भाडं ठेवण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट इतकी मजेदार आहे की,ती पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरणं अवघड झालं आहे. व्हायरल पोस्टमध्ये रिक्षाच्या आतील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. याच रिक्षाच्या आतील एका बाजूला ठळक अक्षरांत लिहिलं आहे की, “प्रेमात फसवलेल्या लोकांसाठी भाडे १० रुपये आहे” आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं आहे की, प्रेमी जोडप्यांसाठी भाडं १५ रुपये आहे.

 

रिक्षाचालकाची ही ऑफर सिंगल लोकांना, विशेषतः प्रेमभंग झालेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी होती. दरम्यान, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘सिंगल लोकांना खरा मित्र सापडला आहे’.

 

हा मजेशीर व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोकही अनेक मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “सिंगल लोकांसाठी सर्वांत मोठा डिस्काउंट”. दुसऱ्यानं लिहिलंय, “प्रेमभंग झालेल्या तरुणांचा तारणहार”. तिसऱ्यानं लिहिलंय, “हा रिक्षाचालक माझा भाऊ आहे! प्रेमात फसवणूक झालेल्यांना तो पाच रुपयांची सूट देत आहे. चौथ्यानं लिहिलं, “कपल्ससाठी १५ रुपये? हे सिंगल्ससाठी स्वर्ग आहे.”

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here