Bigg Boss गाजवणाऱ्या निक्की तांबोळीचं पंजाबी आयटम साँग प्रदर्शित! जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष

0
117

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अभिनेत्री निक्की तांबोळी घराघरांत लोकप्रिय झाली. संपूर्ण महाराष्ट्रात तिची चर्चा सुरू होती. निक्कीने घरात खेळलेले टास्क, तिचे घरातील अन्य सदस्यांशी झालेले वाद, निक्की-अभिजीतची मैत्री, निक्की आणि अरबाजची लव्हस्टोरी या सगळ्या गोष्टी सीझन सुरू असताना सर्वत्र गाजल्या होत्या. ‘बिग बॉस मराठी’ या शोनंतर निक्की सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये सहभागी झालेली आहे.

 

 

निक्की सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शो सुद्धा गाजवताना दिसतेय. यासाठी तिने अनेक नवनवीन पदार्थ बनवायला शिकली आहे. अशातच तिचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. निक्कीचं पंजाबी आयटम साँग नुकतंच प्रदर्शित झालेलं आहे. यामध्ये अभिनेत्री जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय निक्कीच्या एक्स्प्रेशन्सनी सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

 

निक्की तांबोळी ‘इंजेक्शन’ या पंजाबी आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. सिमर कौरने हे गाणं गायलेलं आहे. ‘बदनाम’ या पंजाबी चित्रपटात हे गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सिनेमात जय रंधवा, जस्मिन भसीन, निर्मल ऋषी, मुकेश ऋषी, व्रजेश हिरजी, राणा जंग बहादूर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

 

तुफान एनर्जीसह निक्की ‘इंजेक्शन’ गाण्यात थिरकली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत निक्की तांबोळीचं भरभरून कौतुक केलं आहे. “निक्की क्वीन आहे”, “पुष्पा नाही इंजेक्शन”, “निक्की तांबोळी इज बॅक”, “निक्कीचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”, “जबरदस्त डान्स केलाय निक्कीने” अशा प्रतिक्रिया निक्कीच्या चाहत्यांनी तिचा डान्स पाहून दिल्या आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here