राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! जमिनीच्या मोजणीबाबत  महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

0
388

माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई : शेतजमिनीच्या मोजणीसाठी आता हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केवळ २०० रुपये शुल्कात जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशा उपलब्ध होणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

 

गावांमध्ये भावकीच्या जमिनीवरून होणारे वाद, बांधावरील कुरबुरी आणि कोर्टाच्या आदेशानंतरची मोजणी प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत होता. मोजणीसाठी लागणारे १,००० ते ४,००० रुपये शुल्क अनेकदा सामान्य शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत होते. हीच समस्या ओळखून महसूल विभागाने शुल्कात मोठी कपात केली आहे.

 

ऑनलाईन प्रक्रिया – सोपी व पारदर्शक!
शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावरून घरबसल्या मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. काही आवश्यक कागदपत्रांसह फक्त २०० रुपये भरून ऑनलाईन नोंदणी करता येईल. या सुविधेमुळे कार्यालयीन धावपळ, लाचखोरी आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.

 

तीन प्रकारच्या मोजण्या
साधी मोजणी: ६ महिन्यांत पूर्ण होते. पूर्वी १००० रुपये लागायचे, आता २०० रुपयांतच उपलब्ध.
जलद मोजणी: ३ महिन्यांत पूर्ण. शुल्क २००० रुपये.
अतिजलद मोजणी: एक महिन्यात पूर्ण. शुल्क ३००० रुपये.

 

हा निर्णय शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. भविष्यात भावकीच्या वादांना आळा घालून नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे न्याय मिळवणं सोपं होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here