भारतीय संघाचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरू होईल आणि 7 ऑगस्टला संपेल आणि यादरम्यान दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद द्यायचे हा मोठा प्रश्न समोर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 विश्वचषक 2026 पुढील 2 वर्षांत होणार आहेत. त्यामुळे गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. अजून श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गौतम गंभीरच्या विनंतीनुसार विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की, गौतम गंभीरच्या विनंतीनुसार तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल कारण प्रशिक्षक म्हणून ही त्याची पहिली मालिका असेल.