मोठी बातमी ! प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची भेट

0
218

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी घेतली भेट. प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं.पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण झाली.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकवेळा उपोषण केलं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते. आज ते लातूरवरुन बीडकडे निघाले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची भेट आहे.

आरक्षण बचाव यात्रा
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) ‘आरक्षण बचाव यात्रा’ (Arakshan Bachav Yatra) 24 जुलैपासून सुरु झाली आहे. या यात्रेची सुरुवात मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवरुन झाली. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यापूर्वीच केलं होतं.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालन करत 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये काय?
ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे.
Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे
ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.
100 ओबीसी आमदार निवडून आणणे.
55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी.