मोठी बातमी! आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

0
8

मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.

आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उद्धव ठाकरेंनी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.