
बजेट 2025 सोन्याच्या पथ्यावर पडले. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून किंमती सुसाट झाल्या. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सोन्याची मोठी घोडदौड सुरू आहे. मध्यंतरी एकदा दरवाढीला ब्रेक लागला होता. गेल्या आठवड्यात सोने दणकावून आपटले होते. तर सोमवार आणि मंगळवारी मौल्यवान धातुत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर बुधवारी सोन्याचा दर उतरला. चांदीत तर मोठी पडझड झाली.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोने 86,647, 23 कॅरेट 86,300, 22 कॅरेट सोने 79,369 रुपयांवर आहे. 18 कॅरेट 64,985 रुपये, 14 कॅरेट 50,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,769 रुपये इतका झाला.