महाराष्ट्रातील पोलीस विभागातील काही वरिष्ठ (IPS) आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर काहींना बदलीच्या माध्यमातून आवश्यक संदेश देण्यातआला आहे. राज्यातील सक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांच्यावर पुणे (Pune) जिल्ह्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सातपूते यांच्याकडे हन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा कार्यभार होता. आता त्यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईला तीन नवे उपायुक्त देण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने हे आदेश गुरुवारी काढले. ज्यामध्ये पंकज देशमुख, निमित गोयल, सुधाकर बी. पाठारे यांची बदली मुंबईत करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गृह विभागाने इतरही 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी आणि त्यांचे पद
संदीप सिंह गिल्ल: पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)
पंकज देशमूख: पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
तेजस्वी सातपुते: पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
राजतिलक रोशन: सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
निमित गोयल: पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
विजय चव्हाण: प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर.
दरम्यान, पुणे ग्रामीण अधीक्षक पदावर संदीप गिल्ल, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (सोलापूर) प्राचार्यपदी विजय चव्हाण, पोलीस उपायुक्त नागपूर शहर पदावर लोहित मतानी यांची बदली झाली आहे. ते पूर्वी भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक होते. पुणे लोहमार्ग अधीक्षक पदावर रोहिदास पवार, तर सायबर सुरक्षा अधीक्षक म्हणून लक्ष्मीकांत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांसोबतच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 8 आणि कनिष्ठ श्रेणीमध्ये येणाऱ्या 8 अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. जे भारतीय पोलीस सेवेत आहेत.
एक्स पोस्ट
पाठिमागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. पुणे शहरात तर गुन्हेगारांनी अक्षरश: थैमान घातले आहे. कधी कोयता गँग सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करते, कधी मुलींची छेड काढली जाते. कधी शाळांमध्ये अल्पवयीन मुलींवरही अत्याचाराची घटना पुढे येते तर कधी रेल्वे स्टेशनवरही गोळीबार होतो. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर तरी, शिस्त येणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.