
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत घसरत असलेले सोने आज अचानक महाग झाले आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी १०.१६ वाजता २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ७२४ रुपयांची मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर ९३०२४ रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात, १६ मे रोजी सोन्याने ९२,८५९ रुपयांचा स्तर गाठला होता. काही वेळा हे दर ९२,८०० रुपयांपर्यंत खाली आले होते, पण आज मात्र सोन्याने उसळी घेतली असून ९३,१९६ रुपयांचा उच्चांकही गाठला आहे.फक्त सोनेच नाही, तर चांदीचे दरही वाढले आहेत. आज एमसीएक्समध्ये १ किलो चांदीची किंमत ९५,४९९ रुपये नोंदवण्यात आली असून, काही काळासाठी चांदीने ९५,६४० रुपयांचा उच्चांक गाठला.