
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे : तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शवली. या वेळी भिसे कुटुंबीयांनी आर्थिक मदत नाकारली. दोषींवर तातडीने कारवाई करा, तीच आमच्यासाठी मोठी मदत असेल, अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी या वेळी केली.
शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबीयांची बुधवारी (भेट घेतली. या वेळी शिवसेनेकडून कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. मात्र, ईश्वरी भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी आर्थिक मदत नाकारली.
दीनानाथ रुग्णालयातील दोषींवर कारवाई करा आणि या पैशांमधून गरीब रुग्णांना उपचार मिळावेत, अशी व्यवस्था करा, असे म्हणणे कुटुंबीयांनी मांडले. याआधी चंद्रकात पाटील यांच्याकडूनही एक लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. कुटुंबाने ती मदतही नाकारली आहे.